दर्जेदार शिक्षक घडवणारी रामकृष्ण विद्यालयाची ज्ञानगंगा

कीर्तीताई अर्जुन यांचे प्रतिपादन

अमरावती /30 जून: अमरावती येथील उत्तम नगर परिसरातील रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने शिक्षक घडवण्याच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षकाकडे केवळ पदवी असावी असे नव्हे तर तो राष्ट्राचा खरा कणा असावा, या ध्येयाने हे महाविद्यालय ज्ञान आणि संस्कारांची शिदोरी विद्यार्थ्यांना देत आहे. येथील अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या महाविद्यालयाला इतर संस्थांपासून वेगळे ठरवतो. आजच्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक हा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असावा, यासाठी येथे नियमित अभ्यासक्रमासोबतच विविध कौशल्य विकास उपक्रम राबवले जातात. स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी येथे विशेष मार्गदर्शन वर्ग भरवले जातात. या प्रयत्नांमुळेच अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात विविध पात्रता परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहे. संस्थेच्या अध्यक्षा कीर्तीताई अर्जुन यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय वाटचाल करत आहे. तसेच सचिव डॉ. कमलाकर पायस, प्रशासकीय अधिकारी डॉ. सचिन पंडित आणि प्राचार्य डॉ. कृष्ण माकोडे यांच्या कुशल नियोजनामुळे विद्यार्थी घडवण्याचे हे पवित्र कार्य प्रभावीपणे पार पाडले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button