पूर्व विदर्भ पीठ नागपूर येथून येणार्या ’वसुंधरा पायी दिंडी’ स्वागताची जयत तयारी

अमरावती/15 सप्टेंबर : रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजयांच्या प्रेरणेने पूर्व विदर्भ पीठ नागपूर येथून 11 सप्टेंबर रोजी ’वसुंधरा पायी दिंडी’ची सुरुवात कामठी तालुक्यातील नेरला पिठावरून झाली. 12 सप्टेंबर रोजी सिद्ध पादुका रथावर विराजमान होऊन ही दिंडी 40 दिवसांचा प्रवास करत 21 ऑक्टोबरला नाणीज येथील वारी उत्सवात पोहोचेल.
प्रवासादरम्यान दररोज 20 ते 25 किमी पायी चालत ग्रामस्वच्छता, पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 16 तारखेला यवतमाळ पूर्व मधील कळंब तालुक्यात वसुंधरा पायी दिंडीचे आगमन होणार आहे. यवतमाळ पूर्व,पश्चिम जिल्ह्याने पायी चालणार्या धाम यात्रेकरूना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आली आहे पूर्व विदर्भ पिठातून या दिंडींचे पश्चिम विदर्भ पिठामधे 16 सष्टेंबर ला सकाळी 7 वाजता तालुका कंळब मध्ये प्रवेश करीत करीता पश्चिम विदर्भ पिठ प्रमुख अर्जुन फुले, पिठ व्यवस्थापक सुरेश मोरे जिल्हाध्यक्ष विनायक सवई यांच्या नेतृत्वामध्ये पिठ समिती, अमरावती जिल्हा सामिती, तालुका समिती, सेवाकेंद्र समिती आरती केंन्द्र समिती सर्व शिष्य साधक उपासक, भक्त यांनी हजारोंच्या संख्येनी उपस्थीत राहण्याचे आवाहन रामानंद संप्रदाय अमरावती जिल्हा सेवा समिती च्या वतीने करण्यात आले.





