महानुभाव पंथ आणि ‘लीळाचरित्र’ हे मराठी साहित्यातील अमूल्य धन

डॉ.अण्णा वैद्य यांचे प्रतिपादन, ‘सर्वसामान्यांचे कैवारी श्री चक्रधर स्वामी’ विषयावर व्याख्यान

अमरावती /14 सप्टेंबर- अमरावती विद्यापीठ परिसरात सर्वसामान्यांचे कैवारी श्री चक्रधर स्वामी आणि ’लीळाचरित्र’ या विषयावर एक अभ्यासपूर्ण विशेष व्याख्यान नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते अण्णा वैद्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा ग्रंथ केवळ धार्मिक नसून मानवी जीवनाला नैतिकतेची योग्य दिशा दाखवणारा एक महान वैचारिक ठेवा आहे. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली असून, मान्यवरांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सीमामयी मेटकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन संदीप जुनघरे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र सोरठे यांनी पार पाडले. व्याख्यानात पुढे स्पष्ट करण्यात आले की, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणतीही काल्पनिक कथा नसून चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील प्रत्यक्ष घटनांवर आधारित आहे. महानुभाव पंथाचा विचार हा अत्यंत प्रेमळ, जिव्हाळ्याचा आणि नैतिकतेला धरून असून यात अंधश्रद्धा किंवा दांभिकतेला कोणतेही स्थान नाही. राजा- राजवाड्यांच्या इतिहासासोबतच शेतकरी, ग्वालर, सुतार, कुंभार आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील नोंदी यात अतिशय सूक्ष्मपणे मांडल्या गेल्या आहेत. पैठण येथून सुरू झालेला हा एकात्मवाद, अद्वैत आणि ज्ञानमोचक विचार समाजात नैतिक व सात्विक ज्ञान पसरवणारा ठरला असून, हा विचार आता भारताच्या ज्ञान प्रणालीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू महेंद्र ढोरे यांनी स्पष्ट केले की, याप्रसंगी व्यासपीठावर व्ही. एम. मेटकर, सुभाष पावडे, अमोल ठाकरे, राजेंद्र सोरठे आणि संदीप जुनघरे यांच्यासह शहरवासीयांची व भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Back to top button