ज्ञानमाता हायस्कूलमध्ये वीज ग्राहक जनजागृती व प्रबोधन अभियान उत्साहात
अभियंता दिनानिमित्त आयोजन

अमरावती /15 सप्टेंबर: ज्ञानमाता हायस्कूल, अमरावती येथे विद्यार्थ्यांमध्ये वीज बचत, सुरक्षित वीज वापर तसेच वीज ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वीज ग्राहक जनजागृती व प्रबोधन अभियान व अभियंता दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विजेचा सुरक्षित व काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. घरातील तसेच शाळेतील विद्युत उपकरणांचा वापर झाल्यानंतर ते बंद करणे, अनावश्यक दिवे-पंखे सुरू न ठेवणे आणि वीजेची बचत करणे याबाबत महाराष्ट्र शासन वीज महावितरण अमरावती चे उप कार्यकारी अभियंता श्री रत्नदीप तायडे सर सोनी मॅडम,तसेच प्रशांत काळे सर यांनी हरित ऊर्जा तसेच वीज बचत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.





