जि.प. कन्या शाळा हिवरखेड येथे प्रवेशोत्सव उत्साहात
विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत बैलगाडीतून मिरवणूक

मोर्शी /3जुलै: जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा हिवरखेड पंचायत समिती मोर्शी येथे तालुकास्तरीय शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाघाटक म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड विस्तारअधिकारी शिक्षण पंचायत समिती मोर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैशाली दारोकार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हिवरखेड, गोपाल मालपे सदस्य , कुशकुमार पाथरे विषय तज्ञ बीआरसी मोर्शी तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सविताताई सोनारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हिवरखेड मुले आणि बहुसंख्या पालक उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून बैलगाडीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते ड्रेस व पुस्तकांचे वाटप करण्यत आले . यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कांता माटे यांनी प्रास्ताविके तून शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्वप्न पहायला शिकवा व त्या स्वप्नांना ए आय सोबत जोडा आणि आठवड्यातून एक दिवस जगासाठी ठेवा असे आपल्या उद्घघा टनीय भाषणातून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुबिया मिर्झा यांनी तर आभार प्रदर्शन कु. कृत्तिका पाचारे वर्ग 4था हिने केले.
कार्यक्रमासाठी अनिता पाटील लता लंगडे शिक्षक मित्र नंदिनी पाचारे , मिनल शिरभाते , मंगेश बेंडे यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून जिलेबी वाटण्यात आली . आणि वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




