पथ्रोट येथील ऐतिहासिक द्वारका उत्सव पाहण्यासाठी पंचकोशीतील नागरिकांची गर्दी

पथ्रोट/11 सप्टेंबर-अचलपुर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले पथ्रोट येथे बैल पोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर दुसर्या दिवशी येथे द्वारका उत्सव साजरा करण्यात येतो.या यात्रे मध्ये गावातील जवळपास सात मंडळांचे द्वारका बैल मोठ्या प्रमाणात सजावट करून या उत्सव मध्ये सामील होतात.
येथील झेंडा चौक हनुमान मंदिर या ठिकाणी सर्व द्वारका बैलांची पूजा केली जाते.त्यानंतर गावातील जय किसान द्वारका उत्सव समिती मार्फत या सर्व द्वारका मंडळाच्या अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले, व प्रत्येक मंडळाला 5001 रुपयाचे प्रोत्साहन देण्यात आले.ही परंपरा शंभर वर्षांपूर्वीपासून सतत सुरू आहे. जवळपास गावातील विविध भागातून सात द्वारका बैल यात्रेमध्ये सामील होतात. द्वारका बैल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिक यात्रेमध्ये सामील होतात.दारका उत्सव कार्यक्रमांमध्ये माजी जीप सदस्य श्रीमती वासंतीताई मंगरूळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष अतुल वाट, भाजपा जिल्हा महामंत्री सुधीर रसे, माझी माजी सरपंच आशिष साहरे, माझी उपसरपंच मुरारी अग्रवाल, शिवसेना उपतालुकाप्रमुख बंडू नागे, शिवसेना उभाटा महिला जिल्हाप्रमुख सृष्टी वाघमारे, डॉक्टर विश्वनाथ कविटकर, विनोद खलोकर, रितेश अरबट, सोपान हरणे, दादू डावरे, विजय ढोके, पूजा डावरे, यावेळी उपस्थित होते.





