कोरोना’ लॅब बदलणार विद्यार्थ्यांचे भविष्य
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मिळणार थेट व्यावहारिक धडे

अमरावती /9 जुलै – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे कोरोना काळात सुरू झालेल्या अत्याधुनिक आरटीपीसीआर लॅबचा वापर आता विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. विद्यापीठाने संसर्गजन्य रोगांच्या आण्विक
निदानामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा (सीएमडीआर) अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाढते संसर्गजन्य आजार आणि जागतिक आरोग्य आव्हाने पाहता हा पाठ्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. यामध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19, डेंग्यू, मलेरिया, इन्फ्लूएंझा आणि अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स अशा घातक आजारांच्या तपासणी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष सराव दिला जाईल.हा अभ्यासक्रम आधुनिक डायग्नोस्टिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले करेल. यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळा आणि आरोग्य क्षेत्रात आजारांच्या अचूक निदानासाठी कुशल तज्ज्ञ तयार होतील, अशी माहिती अमरावती विद्यापीठ चे उपसंचालक डॉ. नीरज घनवटे यांनी दिली आहे.




