अंधारे आल्यावर भाजपने काम करायला सुरुवात केली

सुषमा अंधारे यांच्यावरील टिप्पणीवरून पराग गुढे यांनी खा.डॉ. अनिल बोंडे दिला इशारा

महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही

अमरावती /28 ऑगस्ट– शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अमरावती दौर्‍यावरून राजकीय टोलेबाजी तीव्र झाली आहे. जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अंधारे यांनी रुग्णालयाची पाहणी करून प्रशासन आणि सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुढे यांनी भाजपवर निशाणा साधत आरोप केला की, अंधारे यांच्या दौर्‍यानंतरच भाजप सक्रिय झाली आणि घाईघाईत रुग्णालयाची पाहणी करून पत्रकार परिषद घेण्यात आली.
गुढे यांनी खा.डॉ. अनिल बोंडे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, बोंडे यांनी महिलां बद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे.
महिलांचा अपमान
कोणत्याही
स्थितीत सहन केला जाणार नाही. गुढे यांनी इशारा दिला की, या प्रकारचे वक्तव्य सुरूच राहिले तर शिवसेना योग्य वेळी सडेतोड उत्तर देईल.
दहीहंडीवरूनही भाजपवर निशाणा-गुढे यांनी दहीहंडी आयोजनावरून भाजप आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, रवी राणा यांच्या दहीहंडीसमोर कार्यक्रमाच्या फ्लॉप होण्याच्या भीतीपोटी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ते म्हणाले की, सत्ता आणि प्रशासन जेव्हा तुमच्या हातात असते आणि अशा घटना समोर येतात, तेव्हा जनता चांगल्या प्रकारे समजते की राजकारण कोण करत आहे. त्यांनी डॉ. बोंडे यांच्यावर टोला लगावत म्हटले की, कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणारे आता दुसर्‍यांना राजकारणाचे धडे शिकवत आहेत. ’अंधारे आल्या, रुग्णालयाची पाहणी केली’-पराग गुढे म्हणाले की, जिल्हा महिला रुग्णालयात निष्पाप बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतरही पालकमंत्री आणि मुख्यमंत्री अमरावतीला येऊन रुग्णालयाची पाहणी करू शकले नाहीत. याउलट सुषमा अंधारे अमरावतीला पोहोचल्या, त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि प्रशासकीय त्रुटी जनतेसमोर मांडल्या. त्यांनी आरोप केला की, सरकार फायर सेफ्टीशी संबंधित आवश्यक सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले. गुढे यांच्या मते, सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. बालकांच्या मृत्यूनंतरही सरकार आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button