आरोपी सिया आणि प्रियकर चेतनची धक्कादायक कबुली

पुणे /24 जून केतन अग्रवाल हत्याकांडात आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. सिया गोयल साखरपुडा मोडून माझ्यासोबत पळायला तयार नव्हती कारण तिला घरच्यांच्या बदनामीची भीती होती असा खुलासा चेतनने दिला आहे. त्यानंतर दोघांनी मिळून लोहगड येथे केतनला मारण्याचा कट रचला. 18 जूनला प्लॅननुसार सिया तिचा होणारा नवरा केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहचली. तिथेच या दोघांनी त्याला धक्का देऊन मारले.
पोलिसांना कसा आला संशय?-केतनच्या हत्येनंतर सिया गोयलने घरच्यांना फोन करून केतन ट्रेकिंगवेळी पाय घसरून पडला असं सांगितले. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी किल्ल्याच्या तिकिट खिडकीवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तपासाला नवी दिशा मिळाली. या फुटेजमध्ये चेतन हुडी घालून नजरेस पडला. पोलिसांनी बारकाईने हे फुटेज पाहिले तेव्हा सिया चेतनला काही तरी इशारे करताना दिसली. एका दुसर्‍या क्लिपमध्ये सिया अचानक मागे वळली तेव्हा हुडी घातलेला चेतन खाली बसताना दिसला. भीषण उन्हाळ्यात हुडी घालणे आणि त्याच्या शारीरिक हालचालींमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सिया आणि चेतनला अटक केली. या दोघांना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button