डॉ.मनीषा जेजुरकर हायप्रोफाईल खटला सत्र न्यायालयात

प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा

नाशिक/27 नोव्हेंबर : नाशिकमधील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील जप्त केलेला सर्व मुद्देमाल 1 डिसेंबरपूर्वी सत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश गंगापूर पोलिसांना देण्यात आले आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 आणि सहकलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button