विद्यार्थिनीची गळफास घेवून आत्महत्या

एमजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर /27 नोव्हेंबर: शहरातील एमजीएम संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निकिता असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, गुरुवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. वसतिगृहातील खोलीत ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिडको पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. परंतु, या घटनेनंतर वसतिगृहात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकिताने याच वर्षी एमजीएम संस्थेत फिजिओथेरपीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.

Back to top button