पुणे-दिल्लीत इमारती कोसळल्या, 16 लोक दबले

खंडाळ्यात भूस्खलन; सूरतमध्ये पूर, 3400 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

मुंबई/8 जुलै– महाराष्ट्रातील पुण्यात बुधवारी मुसळधार पावसामुळे कचर्‍याचा एक मोठा ढिगारा तीनमजली इमारतीवर कोसळला, ज्यामुळे कचरा व्यवस्थापन केंद्राची इमारत जमीनदोस्त झाली. या ढिगार्‍याखाली 16 जण अडकले होते; त्यापैकी सहा जणांची सुटका करण्यात आली आहे. पावसामुळे मुंबईकडे जाणारी नऊ विमाने इतरत्र वळवण्यात आली. दरम्यान, दिल्लीतील रोहिणी भागात बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यूझाला.पुण्यातील खंडाळा येथे मुसळधार पावसात दरड कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला,तर त्याचा सहकारी अद्याप बेपत्ता आहे. दुसरीकडे, गुजरातमधील सुरतमध्ये 36 तासांत 19 इंच पावसाची नोंद झाली असून, यामुळे 85 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला आहे; यापूर्वी जुलै 1941 मध्ये 18 इंच पावसाची नोंद झाली होती. सुरतमध्ये पडलेल्या या विक्रमी 19 इंच पावसामुळे गेल्या तीन दिवसांत विविध घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण 3,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील रहिवाशांना अन्न आणि पिण्याचे पाणी मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button