सामरा नगरात देहविक्री अड्ड्यावर छापा; पाच जण ताब्यात

देहव्यापाराच्या विळख्यातून तीन परप्रांतीय महिलांची सुटका

राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई

अमरावती /8 जुलै- अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या सामरानगर भागात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठा छापा टाकला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार
गुन्हा नोंदवला असून एका पुरुषासह चार महिला अशा एकूण 5 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये देहव्यापाराच्या दलदलीत
ढकलल्या गेलेल्या पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील 3 पीडित महिलांचा समावेश असून पोलिसांनी त्यांची सुटका केली
आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सामरानगरातील एका घरात छुप्या पद्धतीने देहविक्रीचा
व्यवसाय चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी कुंटणखाना चालवणार्‍या मुख्यआरोपींसह एकूण 5 जणांना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी तिघी जणी या मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. गरिबीचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायात ओढले गेले असण्याची शक्यता आहे. या सर्व 5 आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील
कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजापेठ पोलीस आता या देहविक्रीच्या संपूर्ण जाळ्याचा सखोल तपास करत
असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button