शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाणार
मुख्यमंत्री फडणवीसांचे दिल्लीत महत्त्वाचे विधान

खासदार – आमदार फोडाफोडीच्या चर्चांना पूर्णविराम
नवी दिल्ली/7 जुलै– शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीतील प्रवेशाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडविली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. महायुतीत कोणताही नवा पक्ष सहभागी होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खा. आणि आ. यांना आपल्या बाजूला व ळ ि व ण् य ा च ा कोणताही प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्ट करून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना वेग आला होता. भारतीय जनता पक्षाचे खा. विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले. मात्र दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व शक्यता स्पष्ट शब्दांत
फेटाळून लावल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील महायुतीची सध्याची रचना कायम राहणार आहे.त्यामध्ये कोणत्याही नव्या पक्षाचा समावेश करण्याबाबत कोणतीही चर्चा सुरूनाही. त्यामुळे महायुतीच्या विस्ताराबाबत सुरू असलेल्या चर्चा केवळ
अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या पक्षातील खा. आणि आ. यांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष कोणाच्याही
पक्षात फूट पाडण्याचे काम करत नाही. शरद पवार यांच्या पक्षातील खा. किंवा आ. यांना आपल्या बाजूला आणण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत विविध राजकीय शक्यतांची चर्चा सुरू आहे. पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय होणार असल्याची चर्चा एका बाजूला रंगली होती, तर दुसरीकडे महायुतीत
सहभागी होण्याच्याही चर्चा सुरू होत्या. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी उधाण आले.मात्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाचे आ. रोहित पवार यांनीही या चर्चा निराधार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी अफवांवर विेशास ठेवू नये, असे आवाहन केले.




