बारा बलुतेदारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

महासंघाच्या आमसभेत प्रा.बनसोड व माहोरे यांचे हस्ते सुभाष खंडारे सन्मानीत

अमरावती /7 जुलै: अमरावती जिल्ह्यातील दलित-आदिवासी-वंचित समाज घटकांच्या आणि असंघटित महिला श्रमिक कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या तीन दशकापासून सनदशीर मार्गाने लढा देणार्‍या ‘उपेक्षित समाज महासंघ’ ह्या अराजकीय सेवाभावी
सामाजिक संस्थेची नुकतीच आमसभा संपन्न झाली. महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी महात्मा
फुले डॅा.आंबेडकर, छ. शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचे धर्मनिरपेक्ष व मानवतावादी विचारच जाती-धर्माच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला वाचवू
शकतात. तेव्हा महामानवाचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे यांनी समतेची मशाल पेटवून प्रथम सत्राची सुरुवात केली. महासंघाचे उपाध्यक्ष इंजि. सुभाष गोहत्रे, महासचिव प्रकाश खंडारे, अनारसिंग रावत,
उत्तमराव भैसने, रामलाल खैरे आदिंनी बारा बलुतेदारांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय समस्या विशद केल्या. शासन-प्रशासन व सर्वच  राजकीय पक्षांकडून सत्तेत वाटा देताना अन्याय व उपेक्षा होत असल्याबद्दल तीव्र रोष
व्यक्त केला. महासंघाच्या दुसर्‍या सत्रात सामाजिक व राजकीय चिंतन करण्यात आले. त्यानंतर खालील ठरावांचे वाचन करुन ते एकमताने पारीत करण्यात आले. 1) बारा बलुतेदार – उपेक्षित समाजाच्या विकासासाठी शासनाने त्वरित आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यांच्या पाल्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. 2) राष्ट्रीय स्तरावरील जनगणनेत ओबीसी प्रवर्गातील सर्वच जातींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी वेगळा स्वतंत्र कॅालम टाकण्यात यावा. 3) वंचित भूमिहिनांनाआर्थिक सक्षमीकरणासाठी शेत जमिनी देण्यात याव्या. 4) महात्मा फुले यांचे
द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्य प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी महात्मा फुले भवनची निर्मिती करावी. 5) सत्यशोधक संत
गाडगेबाबा यांना केंद्रसरकारने भारतरत्न ह्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे. बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी सर्वश्री प्राचार्य प्रदीप लांडे, डॅा. शिवलाल पवार, हरिदास पर्वतकार, दिलीप रावत, भास्कर बसवनाथे, इंजि. ज्ञानेेशर कुर्वे, धम्मपाल रामटेके,
डी.एस. यावतकर, पत्रकार गजानन चांदुरकर, जी.जी. फसाटे, उमेशकुमार ढोणे, सुधीर घुमटकर, सुभाष शिंदे, व्ही.डी. भडके,
बाळासाहेब पाचघरे, मधुकर आखरे, कमलाकर धोंगडे, अब्दुल अजित रिजवी सह विविध जाती-जमातीतील कार्यकर्त्यांनी
ठरावाचे समर्थन केले. याप्रसंगी यशस्वी उद्योजक सुभाष खंडारे व सौ. शकुंतला खंडारे  यांना पुष्पगुच्छ , दीपस्तंभ हे विचारपुष्प व गौरव चिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी मेळघाट-धारणीतील
आदिवासींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक समस्यांसाठी प्रबोधन शिबीराची गरज व्यक्त केली. श्रीकृष्ण माहोरे यांनी समारोपीय भाषण केले.

संबंधित बातम्या

Back to top button