बडनेराच्या 25 लाभार्थ्यांना मिळाले पीआर कार्ड
सिंधी समाजातील 75 वर्षांची प्रतीक्षा संपली

श्रीचंद तेजवानी यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला जमिनीचामालकी हक्क
अमरावती/7 जुलै : बडनेरा सिंधी कॅम्प येथील श्री झुलेलाल मंदिरात रविवार रात्री भगवान झुलेलाल यांच्या आरतीनंतर सिंधी समाजाच्या 26 लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काचे पीआर कार्ड वितरित करण्यात आले. भाजप बडनेरा मंडळाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रीचंद तेजवानी यांनी विशेष अभय योजना-2025 अंतर्गत हा हक्क मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला फ्री-होल्ड पीआर कार्ड देऊन मालकी हक्क देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही अभय योजना लागू केली आहे. सद्गुरू स्वामी शांती प्रकाश आश्रमाचे महंत बाबा राम प्रकाश व पूज्य सिंधी पंचायतीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते हे कार्ड देण्यात आले. यावेळी समिती सदस्य सुरेश
हेमनानी, शैलेंद्र मेघवानी, अमरलाल गेही, दीपक दादलाणी व समाजबांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. पंचायतीचे अध्यक्ष चंदुमल बिल्दाणी म्हणाले की, 75 वर्षांपासून प्रलंबित
असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने सिंधी समाजाला खर्या अर्थाने न्याय मिळाला आहे. टेकचंद केसवानी यांनी उपजिल्हाधिकारी जाधव, महसूल अधिकारी कुकडे आणि भूमी अभिलेख नजुल सर्वेक्षक एम.एन. गायकवाड यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला नारायणदास हेमनानी, जियळदास हेमनानी, रमेशलाल सिरवानी, अशोक वरलानी, धरमदास अंदानी, मुन्ना मोटवानी, दयाराम ग्वालानी, राजेश दुल्हानी, महेंद्र सचदेव, हरीश बजाज, श्रीचंद बिल्दाणी, टीकमदास वरलानी आणि पत्रकार बलराम उत्तमानी यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.




