नटसम्राट अनंतात विलीन
मुलाने दिला मुखाग्नी, नानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

’नाना साहेब अमर रहे’ ’नाना साहेब परत या’च्या घोषणा
डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात शेवटचा निरोप
फडणवीस,एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवारांनी घेतले अंत्यदर्शन
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
पुणे /8 ऑक्टोबर : अभिनय क्षेत्रातील लाडकं व्यक्तिमत्व आणि खर्याखुर्या आयुष्यातील ’नटसम्राट’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन झाले. पुणे जिल्ह्यातील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या अभिनेत्याला डोळे भरून शेवटचा निरोप देण्यासाठी आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी डोणजे गावात हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. अश्रू ढाळत आणि जड अंतःकरणाने संपूर्ण महाराष्ट्राने या महान कलावंताला अखेरचा निरोप दिला.
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने त्यांना मुखाग्नी दिली. त्यावेळी ’नाना पाटेकर अमर रहे’ अशा घोषणा उपस्थित असलेल्यांनी दिल्या.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झालं. मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतल्या या दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
नाना पाटेकरांच्या अकाली एक्झिटनं मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील दोना पावलामधील निवासस्थानी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी रंगभूमीसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
निधनाचे वृत्त समजताच गोव्याहून नाना पाटेकरांचे पार्थिव विशेष एअर अॅयम्ब्युलन्सद्वारे पुणे विमानतळावर आणण्यात आले. तिथून रस्तेमार्गे पार्थिव त्यांच्या डोणजे येथील फार्महाऊसवर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.
नाना पाटेकरांना अंतिम निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर डोणजे गावात उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, अर्जुन खोतकर, रुपाली चाकणकर, सदाभाऊ खोत आणि उदय सामंत यांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले.
अभिनेते मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी, प्रवीण तरडे, सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार, लेखक अरविंद जगताप यांच्यासह ’नाम’ फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्याअभिनेत्याला डोळे भरून शेवटचा निरोप देण्यासाठी आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी डोणजे गावात हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. अश्रू ढाळत आणि जड अंतःकरणाने संपूर्ण महाराष्ट्राने या महान कलावंताला अखेरचा निरोप दिला.
नाना पाटेकरांच्या अकाली एक्झिटनं मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील दोना पावलामधील निवासस्थानी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी रंगभूमीसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला





