पोटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सीओईपीच्या फौंडेशनमध्ये सर्वोत्तम पारितोषिके
देशभरातील विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग

अमरावती/30 मार्च: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथे भाऊ फौंडेशनच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील इग्रेटर इनव्होटर ऑफ इंडिया या स्पर्धेत स्थानिक पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील विविध विभागातील विधार्थ्यांनी एक प्रथम, एक सर्वोत्तम आणि एक इनोव्हेटिव्हमध्ये सर्वोत्तम पारितोषीक असे सर्व मिळून 3 पारितोषिके पटकावून सुयश प्राप्त केले.
पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेकनॉलॉजिकल विद्यापीठ, पुणे याचे भाऊ फाऊंडेशनच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. हि प्रोजेक्ट स्पर्धा एकून 5 स्तरांमधून होत असते, प्रत्येक स्तरातील प्रत्येक फेरी एलिमिनेशन फेरी होती यामध्ये संपूर्ण भारतातून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या नवनवीन संकल्पना आणि प्रतिकृती मधून मांडत असतात. ही स्पर्धा दि. 24 व 25 मार्च 2026 रोजी सीओईपीच्या भाऊ फौंडेशनमध्ये आयोजित करण्यात आली असता पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयातील एकूण 05 चमूंनी भारतातील टॉप 30 संकल्पना मध्ये सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये 1) स्मार्ट योगामॅट फॉर प्रॉपर योगसाधना 2) नवजात बालकांच्या लसीकरणासाठी वेळेवर स्मरणपत्रांसह डिजिटल केअरचा प्रभावी वापर 3)पाथफाइंडर: अभियांत्रिकी संधींचे भाकीत 4) कोशफिन (योजना आणि गृह वित्त विषयक ज्ञान): भारताच्या सूक्ष्म अर्थव्यवस्थेला सक्षम करणे 5) फ्लोट अँड फ्लो : ग्रीन एनर्जी ग्रिड यांचा समावेश होता. या सर्वामधून महाविद्यालयाने सर्व सेक्टरमधून एकूण 3 पारीतोषिक प्राप्त केली. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम म्हणून एन्ट्रप्रेनर सेक्टर मध्ये चि. आदित्य सदाफळे आणि कू. मनस्वी वानखडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी यांनी पारितोषिक मिळवले व इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट बाय इंनोवेटर कॉलेज म्हणून पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सवौत्तम कामगिरी करणारे महाविद्यालय म्हणून गौरवण्यात आले. सर्व 6 क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्ट सर्वांगीण प्रकल्प म्हणून एचएचएच सेक्टरमध्ये चि. वेदांत जांभळीकर, चि. विशाल जांभेकर, चि. ललित भाडे, चि. यश साखरकर यांनी संगणक अभियांत्रिकी (एआयएमल) चमूला पारितोषिक मिळाले. या संपूर्ण 5 फेझेस करिता महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रभारी म्हणून प्रा. अक्षय प्र. पुंडकर यांनी सतत मार्गदर्शन आणि परिश्रम घेतले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, उपाध्यक्ष श्री श्रेयशदादा पोटे पाटील, संचालक डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद झुहेर, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. एस. के. नंदा, त्याप्रमाणे सर्व विभाग प्रमुख, डीन्स, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.




