डिलिमिटेशन बीलवर तडजोड नाही

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एम.के.स्टॅलिन यांच्या भूमिकेने भाजपचे टेन्शन वाढले

नवी दिल्ली/27 नोव्हेंबर : भाजपप्रणीत एनडीए सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज होणार आहे. यावेळी मतदारसंघ फेररचना विधेयक सादर करण्यात येईल. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी सरकार अनेक पक्षांशी चर्चा करत असून त्यांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.
पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. तमिळनाडूतील एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे पण, त्यांच्या दोन अटी आहेत. भाजपसाठी द्रमुकचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते द्रमुकच्या या दोन अटी मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ज्या अटी द्रमुकने ठेवल्या आहेत, त्यांना आजच्या (27 नोव्हेंबर 2026) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता द्रमुक सत्ताधारी एनडीएला मतदारसंघ फेररचना विधेयकासाठी पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिलाला ऊचघ पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू असतानाच, पक्ष अजूनही त्यांच्या भूमिकेचा विचार करत आहे, असे कळते. त्यांच्या मागण्यांचा समावेश या कायद्यात केला जाईल का, याबाबत पक्षाला चिंता आहे. द्रमुकने अद्याप डीलिमिटेटश विधेयकाचा मसुदा पाहिलेला नाही आणि जोपर्यंत त्यातील तरतुदींचा अभ्यास केला जात नाही तोपर्यंत पाठिंबा देण्याचे वचन देणार नाही, असे पक्षाने म्हटले आहे. भाजप एका मुख्य मागणीवर तत्त्वतः सहमत झाला असला, तरी दुसरी मागणी पूर्ण करण्याबाबत सरकार हमी देऊ शकेल, याची द्रमुकला खात्री वाटत नव्हती. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी द्रमुकच्या दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे आताची डीलिमिटेशन प्रक्रिया झाल्यानंतर पुढील 25 वर्षांसाठी ही प्रक्रिया गोठवावी आणि दुसरी अट म्हणजे सर्व राज्यांमधील लोकसभा जागांच्या संख्येत 50 टक्क्यांनी समान वाढ केली जावी. विशेष म्हणजे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यानंतर डीलिमिटेशन प्रक्रिया पुढील 25 वर्षे गोठवण्याचा आणि प्रत्येक राज्यात 50 टक्के जागावाढीचा मुद्दा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जी मागणी द्रमुकची होती तीच मागणी इतरही पक्षांची होती.

Back to top button