जलतरण तलावातील पाणी वापराबाबत दिशाभूल

स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांची नाराजी

अकोला /27 नोव्हेंबर- रामदास पेठ, क्रीडा सांस्कृतिक भवन येथील जलतरण तलावामध्ये पाणी भरण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने खालील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे. आठ कोटी खर्च करून अकोल्याच्या विकासामध्ये आणि सर्वसामान्यांना आधार पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून देऊन खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांची मागणी पूर्ण केल्यावर शहरातील काही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना अस्वस्थता झाली असून प्रत्येक कामामध्ये विरोध करण्याची त्यांची सवय आहे आणि स्वस्त लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमांची दिशाभूल करून सातत्याने मीच विकासाचा कर्ता-धर्ता असल्याचे दाखवण्याची प्रत्येक कामामध्ये घाई असणार्‍या निलेश देव यांना असून अकोल्यातील तरण तलाव दुष्काळग्रस्त परिस्थिती असेपर्यंत सुरू होणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येणार असून त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे, परंतु प्रत्येक कामामध्ये द्वेष भाजप लोकप्रतिनिधींविरोधात धनाजी-संताजी सारखे दिसणे हा प्रकार असणार्‍या काही प्रवृत्ती सातत्याने करीत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केला. सदर जलतरण तलावामध्ये प्रारंभिक पाणी भरण्याचे काम एप्रिल-मे 2026 महिन्यातच पूर्ण करण्यात आले होते. सध्यास्थितीत तलावामध्ये अंदाजे 90 टक्के पाणी उपलब्ध आहे. उर्वरित पाण्याची आवश्यक पातळी राखण्यासाठी केवळ टॉप-अप स्वरुपात पाणी भरण्याची कार्यवाही सुरू होती. त्यामुळे सध्या तलावामध्ये नव्याने पूर्ण क्षमतेने पाणी भरण्यात येत असल्याचा समज वस्तुस्थितीला धरून नाही. प्रारंभिक पाणी भरणे आणि त्यानंतर देखभालीसाठी आवश्यक असलेली पाण्याची भरपाई या दोन स्वतंत्र बाबी आहेत, असे विजय अग्रवाल यांनी तांत्रिक अधिकार्‍यांशी, क्रीडा अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या पत्रकात म्हटले आहे. सदर जलतरण तलाव हा आधुनिक चा वापर करून विकसित करण्यात आला आहे. यामध्ये वर विशेष  आवरण आहे. या विशेष संरचनेची गुणवत्ता व टिकाऊपणा दीर्घकाळ अबाधित राखण्यासाठी पाण्याची गुणवत्ता नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Back to top button