न्यू तापडिया नगर उड्डाण पुलाचे काम सुरू

आ.रणधीर सावरकरांच्या प्रयत्नांना यश

अकोला/2 नोव्हेंबर – आ.रणधीर सावरकरांच्या सतत पाठपुराव्यानंतर तापडिया नगर रेल्वे गेट उड्डाण पुलावर मध्य रेल्वे कडून गर्डर टाकण्याच्या कामाची सुरुवात झाली असुन दि. 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण मध्य रेल्वे यंत्रणे कडून गर्डर टाकण्याचे काम सुरू होत आहे, आमदार रणधीर सावरकर तसेच खासदार अनुप धोत्रे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये उड्डाणपुलाच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये सदर उड्डाणपूल जानेवारी 2027 अखेर सेवा समर्पित व्हावा अशा सूचना सर्व संबंधित यंत्रणांना केल्या असता सदरील कामाला गती देण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम जानेवारी 2027 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी पूर्ण करून खुले करावे, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर तसेच खासदार अनुप धोत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता ए.डी. रायबोले, वरिष्ठ अभियंता प्रमोद सर, उप अभियंता राजेश राठोड, उप अभियंता मृणालिनी ढंगारे तसेच रेल्वे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना दिले होते. गुडधी येथील रेल्वे उड्डाणपूल व अंडर बायपास, डाबकी रोड अंडरपास आणि अकोट फाईल रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाच्या प्रगती संदर्भात आढावा बैठकीत देण्यात आले होते यावेळी अधिकार्‍यांनी आश्वासन दिले की, 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान रेल्वे गर्डर उभारण्याचे काम रेल्वे विभाग करेल आणि त्यानंतर नोव्हेंबर व डीसेंबर महीन्यात रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग सिव्हिल कामे पुर्ण करून जानेवारी महिन्यापर्यंत संपूर्ण काम पूर्ण करेल.

Back to top button