दिया मिर्झा यांची अराजक पसरवणार्‍या शक्तींशी हात मिळवणी

महापौर रितू तावडे आक्रमक

मुंबई/2 नोव्हेंबर-उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, मुंबई महानगर पालिकेच्या वतीने एक मोहीम चालवली जात आहे. याअंतर्गत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचे आणि ध्वनी तथा वायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून, अभिनेत्री दीया मिर्झा हिचा एक व्हिडिओ मुंबई महापालिकेने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता. जो भाजपच्या आक्षेपानंतर हटवण्यात आला आहे. दियाच्या त्या व्हिडिओवरून आता मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे देखील आक्रमक झाल्या आहेत.दिया मिर्झा या पहिल्यांदाच काही वादग्रस्त ठरलेल्या नाहीत. त्यांनी कायम त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून आपल्या हिंदू संस्कृतीला आणि देशविरोधी ज्या कारवाया चालतात त्याला प्रोत्साहन देण्याचे काम आणि त्याला हात मिळवणी करण्याचे काम कायमच केले आहे. त्या नेहमीच एक प्रॉपर सिलेक्टिव्ह अजेंडा घेऊन नेहमी काम करतात. एवढेच नाही तर, आपल्या भारत देशामध्ये ज्या अराजक पसरवणार्‍या शक्ती आहेत, त्यांच्यासोबत हात मिळवणीही करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. यामुळे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, दिया मिर्झा यांनी हिंदू सनाच्या बाबतीत आम्हाला शिकवू नये, असे मुंबई महानगरपालिकेच्या महापौक रितू तावडे यांनी म्हटले आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. तावडे पुढे म्हणाल्या, दिया मिर्झा यांना घेऊन ज्या पद्धतीने व्हिडिओ तयार झाला, ज्या कायमच हिंदुत्वाच्या विरोधात, ज्या कायमच भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात काम करतात, अशा दिया मिर्झा यांचा आम्ही काल पूर्णपणे विरोध केला आहे.

Back to top button