भाजप उभी करण्यात नाथाभाऊंचे मोठे योगदान

शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचे कौतुक

अमृत महोत्सवात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

जळगाव /30 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने रविवारी (30 ऑगस्ट) मुक्ताईनगरमध्ये मोठा सोहळा पार पडला. यावेळी, पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी भाजपला उभी करण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान असल्याचे विधान शरद पवार यांनी केले. एकनाथ खडसेंनी भाजपमधे काम केले, भाजप पक्ष कोणी उभा केला असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचे नाव घ्यावे लागेल, असे म्हणत महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान असल्याचे शरद पवारांनी अधोरेखित केले.सुरुवातीच्या काळात भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित होते. पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी ज्या लोकांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यात प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसेयांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. महाराष्ट्रात भाजप रुजविणार्‍यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. असे शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. खडसे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, अनेक वर्षे या भागाची सेवा करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. 1967 ला मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून गेलो. विधानसभेच्या सभागृहात 2 माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली, एक पाटील आणि दुसरे नाथाभाऊ. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या कामाचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

Back to top button