महायुती सरकार संकटातील बळीराजाच्या पाठीशी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

* मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं

परभणी/30 ऑगस्ट- संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतक-यांना वा-यावर न सोडता महायुती सरकार खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडीयम मैदानावर रविवारी शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खासदार संजय जाधव उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्याला असलेली गर्दी जमवलेली किंवा भाड्याची नसून मनापासून उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, भाऊ व शेतक-यांची गर्दी आहे. महायुती सरकारने प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लिहीण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्राप्रमाणे राज्याने शेतक-यांना 6 हजार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमाफी योजनेचा 12 शेतक-यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी व युवकांच्या हिताच्या योजना प्राधान्याने सुरू राहतील. महायुती सरकार सदैव शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणारे असल्याचे त्यानिीं सांगितले. मी आपल्याला सांगू इच्छितो ही लढाई गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी होत आहे. अण्णासाहेब पाटील यांचं आंदोलन देखील आपण पाहिलंय. खर्‍या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकारने केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कुणाचंही आरक्षण कमी न करता 12 ते 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं, आंदोलन केलं तेव्हा त्यांची तळमळ समजून घेतली. मी मुख्यमंत्री असताना 5200 अधिसंख्य पदांचा प्रश्न मार्गी लावला. न्या. शिंदे समिती स्थापन केली, न्या. शुक्रे आयोग स्थापन केला, कोणाचंही आरक्षण कमी न करता 10 टक्के आरक्षण दिलं. अण्णासाहेब पाटील महामंडळातून मिळणार्‍या कर्जाची रक्कम 10 लाखांवरुन 15 लाख केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बंडूभाऊ आपण सांगितलं की मनोज जरांगे यांनी फोन केला होता की हा कार्यक्रमक स्थगित करावा. मी आपल्याला सांगू इच्छितो या मेळाव्याची दोन महिन्यांपासून तयारी होती. कालपासून मराठवाड्यातील लोकं इथं आली होती. हा कार्यक्रम एकदा रद्द झाला होता. हा शेतकरी मेळावा आहे. शेतकरी, मराठा समाजाचा आणि सगळ्या समाजातील लोक आहेत. बळीराजा पोशिंदा आहे, मायबाप आहे, अन्नदाता आहे. कुठलंही राजकारण या शेतकर्‍यांच्या आड येता कामा नये, ही भूमिका आमची आहे आणि त्यांची देखील आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button