पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेजर ध्यानचंद जयंती उत्साहात

अमरावती /30 ऑगस्ट : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले क्रीडाकौशल्य दाखविले. विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा विकास व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळा, तंदुरुस्त राहा आणि यशस्वी व्हा हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले. विद्यालयाचे प्राचार्य सचिन दुर्गे सर, उपप्राचार्या सोनल निस्ताने मॅडम तसेच शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Back to top button