शेतकर्यांना उद्योजक बनविण्यासाठी आरकेएफचा पुढाकार
किसान मित्र अॅप शेतकर्यांच्या दारी

अमरावती /30 ऑगस्ट : शेतकर्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी राजेश कैथवास फाउंडेशन ने (आरकेएफ) पुढाकार घेतला आहे.
प्रक्रिया झालेल्या कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळून देण्यास सुद्धा आरकेएफ बांधील राहणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वलगाव येथील सिकची रिसॉर्ट मध्ये अलीकडेच फाउंडेशनचा कार्यक्रम झाला असून, याला प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे वलगाव विशेष सहकार्य मिळाले.
या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राहुल सातपुते, स्मार्ट योजनेचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, सिकची ट्रस्टचे संचालक सचिन माळकर यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकायांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यासोबतच अमरावती विभागातील फार्मर प्रोड्युसर कंपनी चे प्रतिनिधी आणि शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखील आरकेएफ ने करून दिली आहे. फाउंडेशनचे श्री बालाजी व्यंकटेश आणि अनिकेत चव्हाण यांनी किसान मित्र अॅपची सविस्तर माहिती दिली. कृषी विभागाचे संलग्नित असलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतकयांच्या मालावर प्रक्रिया करू त्यांना पुढील बाजारपेठ मिळवून देण्यासही फाउंडेशनचे सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. शेती आणि शेतकर्यांचा विकास, रोजगार आणि स्वयंरोजगार या तीन प्रमुख घटकावर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील अमरावती आणि नाशिक विभागात काम सुरू झालेले आहेत.याबाबत शेतकर्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमात सर्व स्तरावर सहभाग नोंदवून विकास साधावा, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेश कैथवास यांनी केले आहे. प्रास्ताविक आरकेएफ चे अमरावती विभागीय डायरेक्टर श्री मनीष महल्ले, संचालन टीमचे पंकज मोहोड तर आभार नितेश बुटे यांनी केले.
किसान मित्र अँप चे अनावरण-प्रि हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट मध्ये शेतकर्यांना व्यवस्थापन करताना मोठी अडचण निर्माण होते. त्यानंतर बाजारपेठ मिळवण्यास त्यांना खूप कसरत करावी लागते. या बाबी लक्षात घेऊन, फाउंडेशनने किसान अॅप ची निर्मिती केली. या किसान अॅप द्वारे शेतकर्यांना बाजारपेठ सोबत शेती, शेतकरी, रोजगार, स्वयंरोजगार संदर्भात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एक सप्टेंबर 2026 पासून हे अॅप कार्यान्वित होणार आहे.




