आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादावर असणार नजर

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नवीन नियमावली

मुंबई /26 ऑगस्ट : अगदी थोड्याच दिवसात गणेशोस्तव सुरु होणार असून अनेकांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशामध्ये राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांची जोरदार चर्चा आहे. आगामी गणेशोस्तव, दिवाळी आणि इतर काही सण पुढील काही महिन्यात येत आहेत. यावेळी, मिठाई तसेच अनेक पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री या काळात होते. बुधवारी (26 ऑगस्ट) अन्न व औषध प्रशासनाचे (ऋऊअ) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळातर्फे महाप्रसाद आणि भंडार्‍याचे आयोजन केले जाते तर त्यावर लक्ष असणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, प्रश्न फक्त महाप्रसाद, भंडारा किंवा ईददिवशी काय होते? त्याचा नाही. प्रश्न हा नियमांचा आहे. सर्व काही नियमांनुसार होत आहे की नाही? याचा मोठा प्रश्न आहे. फूड बिझनेसमध्ये प्रत्येकाने परवाना नोंदणी करणे अपेक्षा आहे. जे प्रमाणभूत नियम आधीपासूनच आहेत, ते सर्व पाळावे लागतील. यामध्ये नवे असे काही नाही. यामुळे जिथे जिथे विनापरवाना, विना मानके, शिष्टाचाराशिवाय, काही करत आहेत, तर ते नियमभंग करत आहेत. मग तो सण-उत्सवांचा काळ असो किंवा नसो. प्रत्येक फूड बिझनेस चालकाने लायसन्स घेतले पाहिजे. ही नित्य प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले. तसेच, या सर्व गोष्टींवर नजर असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button