गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विमा कवच
कोणत्या नुकसानीसाठी किती मिळते मदत?

मुंबई/26 ऑगस्ट :दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना दुर्घटना घडून जखमी होणार्या गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास गोविंदाला 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे दहीहंडीच्या थरारात सहभागी होणार्या गोविंदांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुर्घटनाग्रस्त होणार्या गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार आहे.यंदा 4 सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी, तर 5 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. विमा संरक्षणाच्या तरतुदीनुसार दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.




