डिजिटल विवाह नोंदणीस घटणार कागदपत्रांची अट
कार्यालयाचे फेरे पूर्णपणे थांबणार

अमरावती /26 ऑगस्ट- नोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार सुटसुटीत आणि गतिमान करण्यासाठी ’प्रशासन प्रक्रिया पुनर्रचना’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 15 सेवांचे एकत्रीकरण करून त्या 10 सेवांवर आणल्या आहेत. यामुळे विवाह नोंदणी, दस्त नोंदणी आणि प्रमाणित प्रती मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी व डिजिटल होईल.
या नव्या व्यवस्थेमुळे एकाच माहितीसाठी नागरिकांना बारंवार कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. शासकीय प्रणाली डिजिटल पद्धतीने जोडल्यामुळे कार्यालयाचे फेरे टळून वेळेची बचत होईल. शुल्कातील बदल: एका दस्तऐवजाशी संबंधित मालमत्तेचे शुल्क 25 वरून 50 केले आहे. मालमत्ता नोंदणी शुल्क 10 वर्षांसाठी 500 निश्चित केले आहे. सुविधा: प्रतिज्ञापत्राऐवजी स्व-घोषणापत्र चालेल. तसेच घरबसल्या दस्तऐवजांची सूची क्रमांक-2 आणि अधिकृत प्रती मिळतील. या बदलांमुळे विभागीय कामकाज अधिक पारदर्शक व प्रभावी होईल, असे सह जिल्हा निबंधक सुनील वाडेवाले यांनी सांगितले.




