राज्यात खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी

भेसळ केल्यास 10 लाखांचा दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास

नियम मोडणार्‍यांवर होणार कठोर कारवाई

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा

 मुंबई /20 ऑगस्ट ; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात धाडसत्र सुरू केले आहे. अन्न भेसळविरोधात मोठी कारवाई केली आहे.  मुंढे यांनी आता खाद्यतेलाकडे आपला मोर्चा वळवला आहे, सुटे खाद्यतेल विकणार्‍यांवर आता कारवाई होणार आहे, याबाबत त्यांनी एफडीचे नियम सांगितले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुट्या तेलाच्या विक्रिवर बंदी असल्याची माहिती दिली. मुंढे म्हणाले, ’सेफ फूड , सेफ महाराष्ट्र’या अंतर्गत आपण काम करत आहोत. आता आपण काही कंप्लायंस ऑर्डर काढत आहोत. आधी आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिल्क प्रोडक्टबाबत ऑर्डर काढली आहे. राज्यातील शाळांच्या बाबतीतही कंप्लायंस ऑर्डर काढली होती. या सर्वांच्या अंमलबजावणी सुरू आहे. आता सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेच्या अंतर्गत पुढचा टप्पा आहे. याबाबतीत पुढील कंप्लायंस ऑर्डर आपण आजपासून जारी करत आहोत. ही खाद्यतेलाच्या बाबतीत आहे.

खाद्यतेल सर्वांच्या घरात असते. हे खाद्यतेल आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लागते. 2011 च्या कायद्यानुसार लायसन्स असणे किंवा रजिस्ट्रेशन असणे आणि फूड प्रॉड्क्टच्या बाबतीत जे नियम आहेच ते पाळणे त्यानुसार खाद्यतेलाचे प्रोडक्शन होणे आणि विक्री करणे गरजेचे आहे, असेही तुकारम मुंढे यांनी सांगितले.

मागील काही दिवसात खाद्यतेलाच्या बाबतीत गंभीर बाबी आढळल्या आहेत. खाद्यतेलाची इंडस्ट्रीमध्ये पॅकेजिंग असेल किंवा लेबल किंवा ब्रँडवर काम करणार्‍या आस्थापना. या सर्वांबाबत आमच्या एक 8 ते 10 गोष्टी निदर्शनास आल्या आहेत आणि यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यापुढे सुटे खाद्यतेल विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असेही मुंढे यांनी सांगितले.भेसळ केल्याचे प्रकार आम्हाला आढळून आलेत.

 

संबंधित बातम्या

Back to top button