अकोल्यात काँग्रेस नगरसेविकेचे पती याकुब पहलवानची निर्घृण हत्या

भरदिवसा थरारक हल्ला; आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

अकोला /30 जून- अकोला शहरात आज एक काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली असून येथील प्रभाग क्रमांक 17 च्या काँग्रेस नगरसेविका रफिया बी याकूब खान यांचे पती याकूब खान युनूस खान उर्फ याकूब पहलवान यांच्यावर भरदिवसा चाकूने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. स्टेशन रोडवरील जिजाऊ हॉलसमोर दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास हा थरार घडला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य मारेकर्‍याला अटक केली असून जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मयत याकूब पहलवान हे रेल्वे स्थानकाकडून अग्रसेन चौकाकडे त्यांच्या विजेवर चालणार्‍या ओला

संबंधित बातम्या

Back to top button