लहान मुलांचा गुन्हेगारीत वापर करणार्‍यांवर ‘मकोका’ लावणार

बाल गुन्हेगारी कायदे कठोर करणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई/30 जून-राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विविध महत्त्वाच्या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी, नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि कुंभमेळा प्राधिकरणासाठीच्या निधीवरून सभागृहात चर्चा रंगली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत मंदिर रामभक्तांनी बांधलं, पण भाजपने दानपेटी लुटली अशा घोषणा दिल्या. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक संख्याबळ कमी असतानाही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार, काँग्रेस आणि ठाकरे गट आगामी निवडणुकांमध्ये एकत्र राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, नगरविकास विभागातील कथित टीडीआर घोटाळे, स्मार्ट सिटी योजना आणि निधीच्या वापरावरून सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी  नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणासाठी 34 हजार 732 कोटी रुपयांच्या विविध कामांची माहिती दिली, तर मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सरकार संवेदनशील असून मराठी भाषिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही सभागृहात दिली. शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button