स्मार्ट (टिओडी) मीटर शंका निरसन मेळाव्यात ग्राहकांचे समाधान

42 मेळाव्यातून महावितरणने ग्राहकांशी साधला संवाद

अमरावती/1 जुलै: महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी व जनजागृतीसाठी परिमंडळात आयोजित मेळाव्याला वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात आलेल्या वीज ग्राहकांना चेक मीटर व्दारे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंते दिपक देवहाते (अमरावती), रूपेश टेंभुर्णे (यवतमाळ) यांच्या पुढाकारातून परिमंडळात आयोजित मेळाव्याला 847 वीज ग्राहकांनी भेट देत स्मार्ट मीटर विषयी माहिती जाणून घेतली. महावितरण अमरावती परिमंडळात 30 जून ला उपविभाग निहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात काळानुरूप आणि वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची माहिती दिली. जुने फिरणारे चकतीच्या मीटर पासून ते इलेक्ट्रॉनिक मीटर, रेडीओ फ्रीक्वेन्सी मीटर पर्यंतचा होत गेलेला ग्राहकाभिमूख बदलांचा इतिहास सांगत स्मार्ट मीटर अधिक अचूक असून वीजवापर आहे तेवढाच नोंदवला जातो, त्यामुळे बिलींगबाबत असलेल्या तक्रारी कश्या कमी झाल्यात याबाबत माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटर स्वताच मीटर वाचन करत असल्याने रिडींग मध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळून नेमके वीज वापराचे बील दिले जाते.त्यामुळे बिलाविषयीच्या तक्रारी कमी झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच दिवसा वीज वापरावर 85 पैश्या पर्यंतची प्रति युनीट सूट मीळत असल्यामुळे वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर कसे महत्वाचे आहे. याची देखिल माहिती देण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे स्मार्ट मीटर अर्थ लिकेज दाखवत असल्याने संभाव्य घरातील विद्युत धोका टाळता येतो, वीज बिल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्ट मीटर नसून विजेचा वाढता वापर आहे, वीजेचे लिकेज आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना वाढीव वीजबील येत आहे त्यां ग्राहकांनी मीटरपेक्षा आपल्या घरातील आर्थिंग चेक करावी, तसेच आरसीबी लावून घेण्याचाही सल्ला यावेळी देण्यात आला. परिमंडळात 3 लाख 98 हजार 440 स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले असून या ग्राहकांना मागील 3 महिन्यात 1 कोटी 65 लाख रूपयाची दिवसा वीज वापराची सवलत देण्यात आली आहे. स्मार्ट मीटर प्रीपेड नसून पोस्टपेडच आहे,तसेच स्मार्ट मीटरसाठी महावितरण कोणताच भुर्दंड आकारत नाही. मोफत मीटर बदलविण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button