डफरीनच्या आगीत सरकारी रुग्णालयांवरील विश्वास धोक्यात
घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

सुरक्षाव्यवस्थेच्या तपासणीसाठी ठाम आग्रह
अमरावती /24 ऑगस्ट– जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नव्या इमारतीतील नवजात अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने अमरावती हादरली आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेताना पूर्वीच्या खा. नवनीत राणा भावुक झाल्या. अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहिल्या तर गरीब आणि सामान्य नागरिकांचा सरकारी रुग्णालयांवरील विश्वास उडेल, असा संतप्त इशारा त्यांनी दिला. कृत्रिम श्वसनयंत्राचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी आगप्रतिबंधक यंत्रणा का कार्यरत झाली नाही, पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा का सुरू झाली नाही आणि रुग्णालयाची अग्निसुरक्षा तपासणी वेळेवर झाली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. डफरीन रुग्णालयात पोहोचल्यानंतर नवनीत राणा यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नवजात बाळ गमावलेल्याडफरीनची आग : सरकारी… असल्याचे खा. वानखडे यांनी सांगितले.आगीचे नेमके कारण शोधून ते जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. चौकशीत कोणत्याही अधिकारी किंवा संबंधित व्यक्तीची हलगर्जीपणा, दुर्लक्ष अथवा सुरक्षेच्या नियमांकडे कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ चौकशी समिती नेमून विषय संपवू नये, तर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच बाधित कुटुंबांना डफरीनच्या अग्निकांडाने… ता. अंजनगाव सुर्जी) यांचा मुलगा आणि किरण बेठेकर (रा. बोराळा, ता. चिखलदरा) यांची मुलगी अशा तीन नवजात बाळांचा करुण अंत झाला. जन्माला येऊन काही दिवसही झाले नसताना या चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. डफरीन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण 3 कक्ष असून तेथे 39 बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. वाचवण्यात आलेल्या 6 बालकांपैकी काही बालके किरकोळ भाजली असून, खबरदारी म्हणून आजूबाजूच्या कक्षातील इतर बालकांसह त्यांना पुढील उपचारासाठी अतिविशेषोपचार रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि कागदावर असलेली अग्निसुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून सुरू झालेल्या नव्या इमारतीत ही आग लागलीच कशी? आगीच्या वेळी अग्निशामक साधने चालू स्थितीत होती का? धूर शोधणारे अलार्म वेळेवर का वाजले नाहीत? आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण दिले होते का? असे अनेक तिखट सवाल आता अमरावतीकर विचारत आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्येही याच डफरीन रुग्णालयातील व्हेंटिलेटरला आग लागली होती. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेनंतरही प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून कडक कारवाईची मागणी होत आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, मृत बालकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमी बालकांच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही मृत बालकांना श्रद्धांजली अर्पण करून शोकसंतप्त कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे खा. सुप्रिया सुळे यांनी या दुर्घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा तपासणी तातडीने करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवत, नव्या इमारतीत असा निष्काळजीपणा घडणे गंभीर बाब असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने आता केवळ कागदी चौकशी न करता दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करावी आणि रुग्णालयांची सुरक्षा कायमस्वरूपी मजबूत करावी, अशीच मागणी आता जोर धरत आहे. काँग्रेस आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या… आणि कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसून केवळ सत्तेची मस्ती आणि दंडेलशाही सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या या भोंगळ कारभारामुळेच निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेला असून हे पाप पूर्णपणे सरकारचेच आहे. अमरावतीतील स्त्री रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आणि चटका लावणारी आहे. चिमुकल्यांचा जीव जाण्यास जबाबदार असणार्या अधिकार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची सखोल चौकशी व्हावी. राज्यातील रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट कागदावरच राहिले का, असा सवाल करत दोषींना पाठीशी न घालता कडक शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. साहू यांच्या गोडावूनमधून … चौरस फुटांच्या गोदामात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये 30 टनांपेक्षा अधिक धान्य आढळले. पंचांसमक्ष धान्य ट्रकमध्ये भरून वजन करण्यात आले. त्यात 25 टन तांदूळ आणि 6 टन गहू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अजय झुनिलाल साहू याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यातील कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून धान्याचा स्रोत आणि साठ्याबाबत पुढील तपास सुरू आहे. डफरीनमधील आगीच्या …. रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमी बालकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अमरावतीत येऊन डफरीन रुग्णालयाची पाहणी केली. आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीला 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृत्रिम श्वसन यंत्र, विद्युत व्यवस्था किंवा प्रशासनातील कोणाचीही चूक आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी कृत्रिम श्वसन यंत्र, अग्निसुरक्षा तपासणी आणि रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. माजी खासदार नवनीत राणा यांनी अशा घटना पुन्हा घडत राहिल्या तर गरीबांचा सरकारी रुग्णालयांवरील विश्वास उडेल, असा इशारा दिला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांची विशेष अग्निसुरक्षा तपासणी करण्याची मागणी केली. केवळ कागदावर तपासणी करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करणे आवश्यक मानसिक आणि वैद्यकीय आधार मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. जखमी बालकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.अमरावतीतील या घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील नवजात अतिदक्षता विभाग, अतिदक्षता विभाग आणि बालरोग विभागांची विशेष अग्निसुरक्षा तपासणी करावी. तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून दुसर्या कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, असे खा. वानखडे यांनी सांगितले. मृत 3 नवजात बालकांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली




