हजारो बहिणींनी बांधल्या आ.रवी राणांना राख्या
शंकर नगरात सकाळी नऊपासून अभूतपूर्व उत्साह

अमरावती/28 ऑगस्ट -रक्षाबंधनाचे पावन पर्व साधत शंकर नगर येथे आयोजित भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात अमरावतीचे आ.रवि राणा यांना हजारो लाडक्या बहिणींनी प्रेमाची राखी बांधून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अविरत चाललेल्या या भावनिक आणि उत्साही सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भगिनींनी आपल्या लाडक्या आमदाराबद्दलचा जिव्हाळा व्यक्त करताना सुरेल गीते आणि भावस्पर्शी कविता सादर करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी cc यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि कुटुंबाच्या आधारासाठी लोकप्रतिनिधींचे पगार कमी करून लाडक्या बहिणींना 3000 रुपये मानधन देण्याचा निर्धार व्यक्त केला. बहिणींचे हे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगत त्यांनी आयुष्यभर पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले. या सोहळ्यास उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रशांत वानखडे, नगरसेवक अजय जयस्वाल, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती ड प्रिती रेवणे, नगरसेविका अर्चना पांडे, नगरसेविका रजनी डोंगरे, नगरसेविका गौरी मेघवानी, नगरसेवक योगेश विजयकर, नगरसेविका मीरा कांबळे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, ज्योती सैरीसे, अर्चना तालन, चंदा लांडे, सविता नेवारे, समिक्षा गोटेफोडे, वंदना जामनेकर, सिंधु मतलाने, बाळु इंगोले, नितीन बोरेकर, साक्षी उमक, सिमा लवणकर, अल्का इंगोले, पुजा दुबे, संगिता बरमैय्या, अश्विनी झोड, संगिता काळबांडे, प्रेमा लव्हाळे, उषा प्रधान, रईसा परविन, लता अंबुलकर, प्रा. अजय गाडे, रत्ना पाटील, अर्चना पाटणे, सिमा मोलखे, जया माहुलकर, धवने ताई, प्रमोद येतवीकर, शहजाद अहमद, सुचिता वनवे, संदीप कांबळे, शैलेश मेघवानी, कल्पना बनकर, सारिका अवघड, कांचन कडु, उमेश ढोणे, राजा बांगडे, दिघडे ताई, प्रतिभा महाजन, मिलखीस बानो, ज्योती टिंगणे, बाली दारोकार, ज्योती दुर्गे, मिना आगासे, माला खुरसुडे, वनमाला तायडे, मनोज डाहाके, अविनाश काळे, शुभम उंबरकर आणि वंदना पवार यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




