आशियाई क्रीडा स्पर्धेत कुमकुमचे सुवर्णयश

मणीबाई गुजरातील शाळेकडून सत्कार सोहळा

अमरावती /5 ऑक्टोबर : 20 वी आशियाई क्रीडा स्पर्धा जपान येथील आईची- नागोया येथे नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेत भारताच्या संघामध्ये, दी. गुजराती एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मणीबाई गुजराती हायस्कूल व श्रीमती सुलोचनाबेन त्रिकामदास कापडिया गुजराती ज्युनिअर कॉलेज ची विद्यार्थ्यांनी कु. कुमकुम अनिल मोहोड ने धनुर्विद्या स्पर्धेत व्यक्तीगत व सांघीक प्रकारात दोन सुवर्ण पदक व मिक्स डबल स्पर्धा प्रकारात एक रजत पदक प्राप्त करून भव्यदिव्य ऐतिहासिक यश मिळवुन अमरावती शहराचे नाव जागतिक स्तरावर नावलौकिक केले. याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. गणेश जाधव यांनी जाहीर सत्कार सोहळा राजकलम चौक येथे सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता संपन्न झाला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपसंचालक अविनाश पुंड, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अमरावती विभाग, अमरावती अंजली देव मुख्याध्यापिका मणीबाई गुजराती हायस्कूल, अमरावती व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या कुमकुमच्या अभिनंदनामुळे इतरही विद्यार्थी व शाळांना ह्यामुळे प्रेरणा मिळेल व पुढे अमेरिकेत संपन्न होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेकरिता तिची निवड झाल्याबद्दल तिला शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थीना भेटण्याकरिता कुमकुम वेळातला वेळ काढून शाळेत आली व क्रीडा तीर्थला भेट दिली. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापिका अंजली देव, उपस्थित शिक्षक – शिक्षककेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . कुमकुम ने सर्वांचे आभार मानून ऑलिंपिक तयारी करण्याकरिता आपले सर्वांचे पाठबळ माझ्या पाठीशी नेहमी आहे. तर मी नक्की यशस्वी होईलच हा विश्वास व्यक्त केला. दी. गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी.ए. डॉ. निलेशभाई लाठीया, उपाध्यक्ष डॉ. नितीनभाई सेठ, सचिव ड. संजयभाई सांगाणी, कोषाध्यक्ष भरतकुमार भायाणी, सह-सचिव तुषारभाई श्रॉफ, आई.पी.पी. सुरेशभाई राजा व समस्त कार्यकारिणीने तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Back to top button