पोटे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रम

अमरावती /4 ऑक्टोबर   : पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ’ग्रामीण कृषी कार्यानुभव’ उपक्रमांतर्गत, कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमासाठी ’नॅशनल बायोकेम क्रॉप केअर’ येथे एक महिन्याचा यशस्वी कालावधी पूर्ण केला. या एका महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी कंपनीच्या प्रत्यक्ष कामकाजाचा सखोल अनुभव घेतला. यामध्ये प्रामुख्याने विविध उत्पादने तयार करणे, त्यांमधील रासायनिक व जैविक घटक, उत्पादनांचे लेबलिंग, सुरक्षित हाताळणी आणि पॅकिंग या सर्व प्रक्रियेचे प्रात्यक्षिक अनुभवत त्याचे महत्त्व जाणून घेतले. या कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमात पोटे कृषी महाविद्यालयातील गायत्री अढाऊ, जान्हवी इंगळे, पूनम क्षीरसागर, पलक वर्घट, कायेनात खान, प्रणव मनवर, आनंद जाधव, अनुराग हिवरे, अभिमन्यू काळमेघ आणि करण वासनिक हे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे, उपप्राचार्य नितेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता देशमुख आणि कृषी अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. अर्चना त्रिपाठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button