एसटीची साडेतेरा टक्के भाडेवाढ प्रवाश्यांना मोठा झटक
प्रवाश्यांना मोठा झटका

मुंबई /17 जुलै : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या
प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचार्यांच्या
विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होईल. एसटी महामंडळाच्या आर्थिक शोशततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणार्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे. ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि
टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित व विेशासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकार्यांनी दिली.एसटीच्या भाडेवाढीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ,
एसटी कर्मचार्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमतीत झालेली वाढ, यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विेशास कायम ठेवावा, अशी अपेक्षा देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.




