काँग्रेस काळात पेपरफुटीची मोठी मालिका

विरोधकांचे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय नौटंकी

महसूल मंत्री बावनकुळे यांचा घणाघाती हल्ला

अमरावती /17 जुलै – देशात यापूर्वी काँग्रेस राजवटीत परीक्षांचे पेपर फुटण्याच्या मोठ्या घटना घडल्या असून विरोधकांकडून सध्या
सुरू असलेले आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय नौटंकी आहे, असा घणाघाती हल्ला भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी येथे केला. परीक्षांमधील गैरप्रकार समोर येताच आमच्या सरकारने स्वतःहून तातडीने कडक पावले उचलत मोठी
कारवाई सुरू केली आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आंदोलनाचा चांगलाच समाचार घेतला. पेपरफुटीच्या मुद्द्यावर गदारोळ करणारे विरोधक स्वतः सत्तेत असताना का गप्प बसले होते, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसच्या राजवटीत तर देशात पेपरफुटीची एक मोठी साखळीच निर्माण झाली होती. त्या काळात गप्प राहणारे आज मात्र राजकारण करत रस्त्यावर उतरले आहेत.आपण पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकाराचे कधीही समर्थन करणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांच्या काळात अशा प्रकरणांवर पांघरूण घातले जायचे, पण आमच्या सरकारने या
प्रकरणाची माहिती मिळताच कोणाचीही वाट न पाहता स्वतःहून कडक पावले उचलली आहेत. या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना गजाआड करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे काम सरकार पूर्ण ताकदीने करत आहे. त्यामुळे जनतेने अशा भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका

अमरावती – हातातील सत्ता आणि जनतेचा पाठिंबा गेल्यानेच उद्धव ठाकरेंना प्रभू रामचंद्रांची आठवण आली असून, रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून ते केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरेंचे हे आंदोलन केवळ ढोंग असून,  जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हा सगळा राजकीय फार्स सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.अमरावती येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेचे निमंत्रण असूनही मुख्यमंत्री
असताना ठाकरे तिथे गेले नाहीत. त्यांनी कधीही रामाचा जागर केला नाही, उलट लांगूलचालन केले. हनुमान चालीसा वाचणार्‍या नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये डांबणारे ठाकरे आता राजकीय स्वार्थासाठी ढोंग करत आहेत, जनता हे राजकारण ओळखून आहे

संबंधित बातम्या

Back to top button