राज्यसभेसाठी ‘आठवले’ ठरले

3 जागांसाठी भाजपात रस्सीखेच

मुंबई /24 फेब्रुवारी : राज्यसभेच्या 7 जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. विधानसभेत महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्यानं सातपैकी सहा जागा सत्ताधार्‍यांच्या वाट्याला जाणार आहेत. तर विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीला केवळ 1 जागा जिंकता येऊ शकेल. त्यासाठी त्यांना एकजूट दाखवावी लागेल. मविआतील तीन पक्षांनी समन्वय राखला, तरच त्यांना एक जागा जिंकता येईल.
भाजपकडे सध्या विधानसभेत 131 आमदारांचं बळ आहे. काही अपक्ष आणि लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यांच्या जोरावर भाजपचे 4 उमेदवार विजयी होऊ शकतात. यापैकी एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी असेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. रिपाईं आठवले गटाचे अध्यक्ष असलेले रामदास आठवले केंद्रात मंत्रिपदी कायम राहू शकतात. किंबहुना त्यांना मंत्रिपदी कायम राहण्यासाठी राज्यसभेचं सदस्य असणं महत्त्वाचं आहे. राज्यसभेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल. राज्यसभेवर पक्षानं निष्ठावंतांना संधी द्यावी असा सूर असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली. ’वरिष्ठ सभागृहात पक्षानं निष्ठावंतांची वर्णी लावावी, असा मतप्रवाह आहे. पण या आग्रहाला आठवले अपवाद आहेत. आठवलेंच पक्ष गेल्या दशकभरापासून भाजपच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल,’ अशी माहिती सुत्रांनी दिली. रामदास आठवले यांना संधी दिल्यास दलित समाजात सकारात्मक संदेश जाईल, असं भाजप च्या थिंक टँकला वाटतं. 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. भाजपला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. त्या निवडणुकीच्या आधीच भाजप आणि रिपाईं (आठवले) यांची युती झाली. आठवले यांना लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेवर संधी देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button