सरकारने करार मोडला, पुुन्हा आंदोलन
बिहार, पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल, कपिल सिब्बल यांच्याकडून 1 कोटींची मदत

विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर मदत करणार, वकिलांची फौज एकत्र करणार
नवी दिल्ली/27 जुलै : नीट परीक्षेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र देशभरात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याचपार्श्वभूमीवर आता कॉक्रोच जनता पार्टी मैदानात उतरली असून विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी मदत करताना दिसत आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी रविवारी (26 जुलै) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली होती. यानंतर आज सीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत कपिल सिब्बल यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आंदोलक विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यासोबत दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतला. यावेळी सौरव दास म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासूनच ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्याशी सल्लामसलत करत होतो. आम्ही त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन घेतले आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पण या काळात काही व्यक्तींनी राजकीय हेतूने प्रेरित अशा जनहित याचिका (झखङी) दाखल केल्या होत्या. पण ही युवा चळवळ कोणत्याही प्रकारे भरकटू नये किंवा तिला खीळ बसू नये, मग ती आंदोलनात घुसखोरी करणार्या समाजकंटकांमुळे असो किंवा न्यायालयांमार्फत चळवळ मोडून काढण्याच्या प्रयत्नांमुळे असो, याची आम्हाला खात्री करायची होती आणि तोच आमचा उद्देश होता. कारण जेव्हा आम्ही 25 तारखेला आंदोलन मागे घेतले, तेव्हा आम्हाला अशी भीती वाटत होती की, आंदोलनाचा जोर ओसरल्यावर भविष्यात सरकार काही व्यक्तींना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल. ही भीती अगदी रास्त होती, कारण यापूर्वीच्या आंदोलनांमध्येही अशीच कार्यपद्धती (पॅटर्न) दिसून आली आहे. यापूर्वी काही व्यक्तींना लक्ष्य केले गेले आणि त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले गेले. त्यामुळे सीजेपी पहिल्या दिवसापासूनच सर्व विद्यार्थ्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवत आहे. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वकिलांशी समन्वय साधत आहे. त्यामुळे, याच भीतीपोटी आम्ही कपिल सिब्बल यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या, कपिल सिब्बल म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी उपोषण केले आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले, त्यांच्याबद्दल मला आमची चिंता व्यक्त करायची आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. कारण मुळात ही एक स्वयंस्फूर्त (ऑरगॅनिक) चळवळ होती. त्यामुळे हे सरकार असो किंवा कोणतंही सरकार असो, कोणत्याही प्रकारे मतभेदाचा आवाज उठू नये. जे. पी. नड्डा नेमके कशावर सहमत झाले, याची मला कल्पना नाही. पण जेव्हा सीजेपीवाले माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना सांगितले की, कायद्याच्या आधारे आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. दिल्लीत असो किंवा महाराष्ट्रात शांततापूर्ण आंदोलन झाली आहेत.




