शेतकर्‍यांचे वैयक्तिक कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज माफ करा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची मागणी

बारामती /2 सप्टेंबर  : ‘दुष्काळी परिस्थितीमध्ये पाऊस पडला नाही तर माणसे कशी जगवायची हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे,’ अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी त्यांनी पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.
पवार म्हणाले,‘ राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात आहे. राज्य सरकारने या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकर्‍यांना द्यावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाऊस पडला नाही तर माणसे कशी जगवायची हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 27 सप्टेंबर रोजी पत्र लिहले. त्यानुसार राज्य सरकारने काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, तर काही तालुक्यांमध्ये अद्यापही दुष्काळ जाहीर झालेला नाही. तो जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आहे.’ असेही पवार म्हणाले.

Back to top button