अमरावतीतून प्रा. आदिती पोहरे यांना उमेदवारी
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू

काँग्रेसकडून तीन उमेदवारांची यादी जाहीर
अभिजित वंजारी (नागपूर), जयंत आसगावकर (पुणे) यांना संधी
मुंबई /2 सप्टेंबर : विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे.या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुणे, नागपूर, अमरावती जागेसाठी तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून आदिती पोहोरे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी शुक्रवारी रात्री या नावांची घोषणा केली. अभिजित वंजारीयांनी या मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला सर करण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांची उमेदवारी कायम ठेवण्याची भूमिका घेतली. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत दिनकर आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जयंत आसगावकर या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसने विद्यमान आमदारावरच पुन्हा विश्वास दाखविला आहे.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. पोहरे यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांचे नाव शिक्षक मतदारसंघासाठी चर्चेत आले होते. प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केलीय. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे





