‘पीएम विश्वकर्मा लोन उत्सव’ उत्साहात

अमरावती/27 जुलै: सेंट्रल बँक ऑफ इंडियााच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै रोजी ’पीएम विश्वकर्मा लोन उत्सव’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक संचालक ई. रतनकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पुणे अंचल प्रमुख अजयकुमार सिंह, वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय, एमएसएमई-डीआय संचालक विजय सिरसाठ, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाळे, युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रमोद परहाते, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रमुख महेश डांगे, बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख निर्मेश जी., खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रदीप चेचरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये या योजनेची भूमिका, तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांविषयी मार्गदर्शन केले. तसेच नुक्कड नाटकाच्या माध्यमातून योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात आली.यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. लोन उत्सवादरम्यान 356 लाभार्थ्यांना साडेतीन कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांनी प्रास्ताविक केले. निलेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.




