सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष

शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष, भाजपला ‘दे धक्का’

सांगली /18 नोव्हेंबर: जिल्हा बँकांच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकांनंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी होत आहेत. सातार्‍यात भाजपला धक्का शंभुराज देसाईंनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला संधी दिली. येथे राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर अध्यक्ष बनले असून शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर, आता सांगलीतही भाजपला धक्का देण्यात आला. राज्यात अत्यंत चुरशीची झालेल्या सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकासाठी आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळला. सांगलीतील काँग्रेस नेते महेंद्र लाड यांची सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर उपाध्यक्ष पदी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी पाटील यांची निवड झाली.

Back to top button