दहशतवादी लतीफ एनकाउंटरमध्ये ठार

मशिदीत लपला होता कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड

जम्मू-काश्मीर/18 नोव्हेंबर-  जम्मू-कश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर लतीफ भट मारला गेला. तो येथे एका मशिदीत लपून बसला होता. त्याला सुरक्षा दलांनी अनेक वेळा आत्म समर्पण करण्या साठी संधी दिली. मात्र त्याने आत्म समर्पनाला नकार दिला होता. यानंतर, सुरक्षा दलाने त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराचे गोळे सोडले. यानंतर, तो मशिदीतून बाहेर येताच त्याला गोळ्या घालून कंठस्नान घालण्यात आले.

Back to top button