विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट

उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय समीकरणे बदलली

बंडखोरीमुळे सर्वच पक्षाची धाकधुक वाढली

मुंबई/9 ऑक्टोबर  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणार्‍या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरला संपली आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधील या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज कायम ठेवल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.काही मतदारसंघांत थेट, तर काही ठिकाणी तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. मतदान 23 ऑक्टोबरला, तर मतमोजणी आणि निकाल 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहेत.

Back to top button