काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून बावनकुळेंचे कौतुक

वडेट्टीवार यांना भाजपच्या ऑफरने जोरदार चर्चा

कोल्हापुरात तेली समाज बांधवांचा मेळावा

कोल्हापूर/23 ऑगस्ट ; तेली समाजाने महाराष्ट्रात संस्कार आणि सामाजिक मूल्यांची परंपरा जपली असून, राज्याला नवी दिशा देण्याचे काम हा समाज करत आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोल्हापुरातील तेली समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या शिक्षण, संघटन आणि जागेच्या प्रश्नांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.
संत जगनाडे महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर तेली समाज वाटचाल करत असल्याचे सांगत बावनकुळे यांनी समाजबांधवांना मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन केले. मुलं ही आपली प्रॉपर्टी असून देशाचे भविष्य आहेत. 2047 चा विकसित भारत म्हणजे तेलीसमाजातील उच्चशिक्षित मुलगा आणि मुलगी हाच खरा भारत असेल, असे ते म्हणाले. तेली समाजातील विविध संघटनांना एकत्र आणून जातीपातीच्या भिंती तोडण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी मंत्री असताना समाजाला प्लॅटफॉर्म दिला आणि आता समाजाचे प्रश्न पुढे नेण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षात ताकद असलेला नेता म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभेत त्यांचा आवाज कणखर आहे. त्यांचे भाषण संपेपर्यंत मी सभागृह सोडत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बावनकुळे यांनी एक मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. वडेट्टीवारजी आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागेल. 2029 ला प्रयत्न करा, नाहीतर फार काळ तिकडे राहू नका, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. आपण आणि देवेंद्र फडणवीस वडेट्टीवारांचे जवळचे मित्र असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button