भातकुली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

भातकुली/24 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशील कौशल्य विकसित व्हावे, तसेच त्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भातकुली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2026 चे आयोजन गुरुवार, दि.26 व शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी राष्ट्र ीय शेतकी विद्यालय, खोलापूर, ता. भातकुली, जि. अमरावती येथे करण्यात आले आहे. भातकुली पंचायत समिती शिक्षण विभाग, भातकुली तालुका मुख्याध्यापक संघ, भातकुली तालुका विज्ञान अध्यापक मंडळ आणि राष्ट्रीय शेतकी विद्यालय, खोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रतिकृती नोंदणी व मांडणी, तर सकाळी 11 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी विधान परिषद सदस्य माजी विद्यार्थी राजीवजी पोतदार उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टापर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अश्विनकुमार के. टापर राहतील. विधानसभेचे सदस्य राजेशजी वानखडे विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी टापर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. किरणकुमार के. टापर, शिक्षणाधिकारी श्री. सिद्धेश्वर काळूसे, गटशिक्षणाधिकारी श्री. रामेश्वर माळवे, माजी मुख्याध्यापक संजीव काळे, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे, सचिव प्रदीप नानोटे, भातकुली तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव अमोल महाले, कार्याध्यक्ष सय्यद रेहान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रदर्शनातील प्रतिकृतींचे मूल्यमापन होईल. दुपारी 12.30 वाजता अतिथी-विद्यार्थी स्नेहभोजन, तर दुपारी 2 वाजता समारोप समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टापर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. किरणकुमार के. टापर राहणार असून, विशेष प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर, डॉ. इमरान खान आणि रमेश्वर माळवे उपस्थित राहणार आहेत.ङ्गङ्गतसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी व विविध शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोपानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे व शिक्षकांना कार्यक्रम सहभागाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृती व प्रयोग पाहण्याची संधी मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला प्रोत्साहन देण्यास हे प्रदर्शन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालवैज्ञानिकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.





