उद्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा

आर.डी.आय.के. महाविद्यालयाचा उपक्रम

विजेत्यांचा रोख पुरस्काराने होणार गौरव

अमरावती/24 नोव्हेंबर – विद्यार्थ्यांना वक्तृत्वकलेतून आपले विचार, सामाजिक प्रश्नांवरील भूमिका आणि अभ्यासपूर्ण मते मांडण्याची संधी मिळावी, यासाठी 26 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रॅडफर्ड रामराव उर्फ अन्नासाहेब देशमुख स्मृती चषकाच्या निमित्ताने होणार्‍या या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांना तीन विषयांपैकी एका विषयावर आपले वक्तृत्व सादर करता येणार आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी ‘जैन धर्म : सामाजिक कार्य आणि राजकारण’, ‘खाद्यपदार्थांच्या व्यापारातील अधिकार’ तसेच ‘मातीची तहान आणि शेतकर्‍यांचे अश्रू : कोरड्या शेतीची खरी परिस्थिती’ हे तीन विषय निश्चित करण्यात आले आहेत. या विषयांतून सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शेतीविषयक प्रश्नांवर विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येणार आहेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, पदके व प्रमाणपत्रे देण्यात येतील. तसेच सहभागी गटांमधील एका विशेष स्पर्धकाला ब्रॅडफर्ड रामराव उर्फ अन्नासाहेब देशमुख स्मृती चषक कायमस्वरूपी प्रदान केला जाणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी एस. व्ही. जगताप यांच्यासह अन्य प्राध्यापकांच्या समितीकडे सोपविण्यात आली आहे.

Back to top button